समर्थच्या विद्यार्थ्यांचे विभागीय क्रीडा स्पर्धा मध्ये यश.

इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (IEDSSA) मार्फत घेण्यात आलेल्या विभागीय (डी-१ झोन) स्पर्धा नुकत्याच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे पार पडल्या.विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेत समर्थ पॉलिटेक्निक च्या नेहा दरेकर हिने २०० मीटर,४०० मीटर,८०० मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.लांब उडी-प्रथम क्रमांक-श्रावणी दुरगुडे (समर्थ पॉलीटेक्निक) गोळाफेक-प्रथम क्रमांक-आकांक्षा गावडे (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी)गोळा फेक व भालाफेक द्वितीय क्रमांक-चारू मुळे (समर्थ पॉलीटेक्निक) रीले ४ x १०० मीटर (मुली)द्वितीय क्रमांक-आकांक्षा मुळे,निकिता वाळुंज,ऋतुजा हुंडारे,तनुजा थोरात व श्रावणी दुरगुडे (समर्थ पॉलिटेक्निक)रीले ४ x ४०० मिटर (मुली)प्रथम क्रमांक-आकांक्षा मुळे,निकिता वाळुंज,ऋतुजा हुंडारे,तनुजा थोरात,श्रावणी दुरगुडे,साक्षी पळसकर,नेहा दरेकर (समर्थ पॉलिटेक्निक

द्वितीय क्रमांक-अवंतिका गोफणे,पायल कीठे, साक्षी पवार,प्राची म्हस्के (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी)उंच उडी(मुले)प्रथम क्रमांक -साहिल जाधव (समर्थ पॉलीटेक्निक)तिहेरी उडी(मुले)द्वितीय क्रमांक-अर्शद शेख (समर्थ पॉलिटेक्निक)भालाफेक (मुले)द्वितीय क्रमांक-रमीझराजा शेख (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी)रीले ४ x १०० मीटर (मुले)द्वितीय क्रमांक-सोहम शिंदे (समर्थ पॉलिटेक्निक)रीले ४ x ४००मीटर (मुले)प्रथम क्रमांक-रोहन बोऱ्हाडे (समर्थ पॉलिटेक्निक)सेच इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (IEDSSA) मार्फत घेण्यात आलेल्या विभागीय खो-खो (डी-१ झोन) स्पर्धा नुकत्याच कुरण येथे पार पडल्या.त्यामध्ये समर्थ पॉलिटेक्निकच्या मुलींच्या संघाने रोमहर्षक विजय मिळवत अव्वल

क्रमांक मिळवला.

भिमाशंकर करंडक समूहनृत्य स्पर्धेत समर्थ च्या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथील सांस्कृतिक विभागाच्या वतीने समूह नृत्य स्पर्धेसाठी भिमाशंकर करंडक आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव २०२४ साठी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.जुन्नर,आंबेगाव,खेड,शिरूर तालुक्यातून तसेच परिसरातील बहुसंख्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.नृत्यातून मनोरंजनाचा अप्रतिम नृत्याचा कलाविष्कार सादर करणाऱ्या समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथील विद्यार्थ्यांनी भिमाशंकर करंडक २०२४ च्या महाअंतिम सोहळ्यामध्ये समूहनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावल्याची माहिती फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी दिली.

समर्थ शैक्षणिक संकुलात ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेचे आयोजन

समर्थ शैक्षणिक संकुलात ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे बहि:शाल विभाग व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स बेल्हे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जेष्ठ नागरिक कार्यशाळा आज संकुलामध्ये संपन्न झाली.धमाल विनोदी एकपात्री, हास्य पंचमी या कार्यक्रमाचे जनक मा.श्री.बंडा जोशी पुणे यांनी जेष्ठ नागरिकांना आपल्या विनोदातून व किस्स्यातून मनमुराद निखळ आनंद दिला.त्याचप्रमाणे गझलकार प्रा.जयसिंग गाडेकर,दत्तात्रय पायमोडे, अनिल काळे,बाळकृष्ण लळीत यांनी देखील उपस्थितांना वेगवेगळ्या विषयावर माहिती प्रदान केली. या कार्यशाळेसाठी तांबेवाडी, गुंजाळवाडी, बांगरवाडी, बेल्हे, गुळंचवाडी, आणे , नळवणे, झापवाडी मंगरूळ अशा अनेक ठिकाणावरून 200 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. समर्थ शैक्षणिक संकुलात या सर्व ज्येष्ठ नागरिकांना भोजन यावेळी संस्थेच्या वतीने समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या सहकार्यातून ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके, जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष, व इतर सर्व गावांमधील ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष उपस्थित होते. तसेच समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, समर्थ इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.गणेश बोरचटे, बहिशाल विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.हर्षदा मुळे, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समर्थ शैक्षणिक संकुलात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव विवेक शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,बीसीएस चे प्राचार्य डॉ. उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी,प्रा.संजय कंधारे,एमबीएचे प्राचार्य शिरीष नाना गवळी,डॉ.महेश भास्कर,समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर,लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनिल कवडे,समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,आयटीआयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,विष्णू मापारी,समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश पाडेकर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.