श्रमदानातून विद्यार्थ्यांनी राजुरी उभारले हजारो रुपयांचे बंधारे –

क्राईमनामा Live : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्टीय सेवा योजना व समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स काॅलेज ऑफ इंजिनिअरींग आणि समर्थ काॅलेज ऑफ काॅम्प्युटर सायन्स,बेल्हे(बांगरवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर राजुरी (ता.जुन्नर) येथे २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत संपन्न होत आहे.

शिबिराचे उदघाटन माजी सभापती दिपकशेठ औटी व सरपंच प्रियाताई हाडवळे यांच्या शुभहस्ते झाले.

या शिबिरातील विद्यार्थ्यांनी जल संवर्धन ही काळाची गरज ओळखून नियोजन बद्ध रित्या गावचे सर्वेक्षण करून बंधाऱ्यांविषयी माहिती संकलित केली.आणि डोबी डुंबरे मळयातील ओढयावर श्रमदानातून ३ ठिकाणी वनराई बंधारे बांधले आहेत.यामध्ये एका ओढयाला वाहते पाणी आडवून त्या ठिकाणी २०० सिमेंट च्या गोणींमध्ये वाळू भरून त्या एकमेकांवर रचत चार-पाच थर तयार करून हा बंधारा बांधला.हे बंधारे बांधल्याने पूर्वेकडून येणारे पाणी बऱ्याच अंशी अडवले जाऊन त्याचा विहिरी,बोरवेल व शेतीपूरक उद्योगधंद्यासाठी विनियोग होणार असून पूर्ण परिसर जलमय होणार आहे.

सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात वावरताना आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून राष्ट्रीय सेवा योजनेतील १२५ विद्यार्थ्यांनी राजुरी गावचे सर्व्हेक्षण करून या बंधाऱ्याच्या माध्यमातून जलसंवर्धन-पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्तिमंत स्वरूप प्राप्त करून दिल्याने स्थानिकांकडून कौतुक केले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व राजुरी गावचे उपसरपंच माऊलीशेठ शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,डॉ.अनिल पाटील,राजुरी गावच्या सरपंच सौ.प्रिया ताई हाडवळे,रासेयो समन्वयक प्रा.विपुल नवले,कार्यक्रम अधिकारी प्रा.दिनेश जाधव,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर,क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,बाळू हाडवळे,गोपाळ नाना हाडवळे,अशोक हाडवळे,नंदू शेठ हाडवळे, बाजीराव हाडवळे,स्वप्नील हाडवळे,वसंत हाडवळे,ममताराम हाडवळे,ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ पाटील औटी,सखाराम गाडेकर,शाकिर भाई चौगुले,निलेश हाडवळे 

आदी मान्यवर तसेच स्थानिक शेतकरी भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्यांकडे पाहून सरपंच व स्थानिक शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.जवळपास १ लक्ष ५० हजार रु.चे बंधाऱ्यांची कामे झाल्याची माहिती मुक्तामाता मंडळ डोबी डुंबरेमळ्याचे अध्यक्ष बाळू हाडवळे यांनी माहिती दिली. सर्व ग्रामस्थांचे या कामी विशेष सहकार्य लाभले.सर्व उपस्थितांचे डॉ.लक्ष्मण घोलप यांनी आभार मानले.

नेतृत्व गुणांची प्रयोगशाळा म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना:दिपकशेठ औटी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. राष्ट्रीय सेवा योजना समर्थ ग्रुप ऑफ इंस्टिट्युशन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आणि समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बांगरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृतमहोत्सव माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना यांनी विशिष्ट संस्कार शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी येथे 21 फेब्रुवारी द ते 27 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये संपन्न होत आहे.

समर्थ महाविद्यालयात विद्यार्थिनींना दिले जातात स्वसंरक्षणाचे धडे

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) येथे नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजीनियरिंग बेल्हे,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,बेल्हे व निर्भया पथक आळेफाटा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “निर्भय कन्या अभियाना अंतर्गत संकुलातील विद्यार्थीनींसाठी कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या अभियानामध्ये संकुलातील ११६५ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,समर्थ एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.सुभाष कुंभार,ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या वैशाली ताई आहेर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमोल भोर,प्रा.अमोल काळे,क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे आदी उपस्थित होते.

आळेफाटा पोलीस स्टेशन च्या वतीने निर्भया पथकाच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देतांना पोलिस उपनिरीक्षक रागिणी कराळे यांनी विद्यार्थिनींसोबत चर्चात्मक संवाद साधला.महिलांवर होणारे अत्याचार,मुलींची छेडछाड रोखण्यासाठी निर्भया पथक कार्यरत असते.परंतु ते सर्वांपर्यंत घटना घडतात पोहोचलेच असे नाही.त्यासाठी स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे म्हणून अशा कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाची गरज असल्याचे यावेळी रागिणी कराळे म्हणाल्या.स्त्री सबलीकरण आणि सक्षमीकरण काळाची गरज आहे.संकुलामध्ये महिला सबलीकरण,व्यक्तिमत्व विकास,स्वास्थ्य,महिला उद्यमशीलता,स्त्री-पुरुष समानता यांसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना बौद्धिक,शारीरिक,मानसिक व भावनिक इ.स्तरावर विद्यार्थिनींना सक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो.

यावेळी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.

कराटे प्रशिक्षक विनायक वऱ्हाडी व महेंद्र गुळवे यांनी मुलींना स्वसंरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या डावपेचाची माहिती प्रात्यक्षिकासह दिली.

आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थिनींनी काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.आपल्यावर एखादा प्रसंग ओढावला असताना आपण त्या प्रसंगातून स्वतःची सोडवणूक करण्यासाठी आपल्या हाताच्या साह्याने पायाच्या साहाय्याने किंवा वेगवेगळ्या शारीरिक तंत्रशुद्ध प्रात्यक्षिकांच्या साह्याने कशाप्रकारे आत्मसंरक्षण करू शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवले आणि विद्यार्थिनींना देखील ते करायला लावले.आपल्या हाताचा पंजा त्याचप्रमाणे त्याचा होत असलेला वापर सक्षमतेने करण्यासाठी कशा प्रकारच्या हालचाली हव्यात, त्याचप्रमाणे जर चार ते पाच व्यक्तींनी आपल्यावर हल्ला केला तर तो हल्ला कसा परतवून लावायचा याबाबत सविस्तर प्रात्यक्षिक करून दाखवले.

ग्राहक दिन विशेष: ग्राहकांनी आयोगाकडे तक्रार करण्यासाठी इ – दाखील या कार्यप्रणालीचा वापर करावा-ॲड. तुषार झेंडे पाटील

*⭕ग्राहकांनी आयोगाकडे तक्रार करण्यासाठी इ – दाखील या कार्यप्रणालीचा वापर करावा-ॲड. तुषार झेंडे पाटील*

*https://shivnerwarta.in/?p=17382*

जिद्द,चिकाटी,मेहनत व सातत्यपूर्ण सराव हीच यशाची पंचसूत्री:प्रा.एच पी नरसुडे

*⭕जिद्द,चिकाटी,मेहनत व सातत्यपूर्ण सराव हीच यशाची पंचसूत्री:प्रा.एच पी नरसुडे*

*https://shivnerwarta.in/?p=17452*

*जिद्द,चिकाटी,मेहनत व सातत्यपूर्ण सराव हीच यशाची पंचसूत्री:प्रा.एच पी नरसुडे*
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा (मुले व मुली) समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) येथे दिमाखात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके व माजी प्राचार्य,राष्ट्रपती पुरस्कार विजेते एच पी नरसुडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती चे सचिव डॉ.रमेश गायकवाड,प्रा.डॉ.सुनील पानसरे,डॉ.संतोष पाचारणे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,प्रा.ज्ञानदेव जाधव,प्रा.अमृत पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एच पी नरसुडे म्हणाले की प्रत्येक खेळ हा आवडीने खेळला पाहिजे नव्हे नव्हे त्या खेळामध्ये आवड निर्माण केली तर यश नक्कीच तुमचे आहे.जिद्द,चिकाटी,मेहनत व सातत्यपूर्ण सराव हाच यशाचा खरा गाभा असून त्याचे तंतोतंत पालन करून जीवनात उत्कर्ष साधावा.मैदानी खेळ आणि व्यायामाने शारीरिक क्षमता तर बुद्धिबळ सारख्या खेळाने मानसिक क्षमता उंचावते असे ते यावेळी म्हणाले.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून दोनशे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
मुले-
प्रथम क्रमांक:
समीर इनामदार(राजमाता जिजाऊ महाविद्यालय,भोसरी)
द्वितीय क्रमांक:
यशोदीप खंडागळे(पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय,निगडी)
तृतीय क्रमांक:
दीपेश पटेल(डी.वाय.पी.आय.ई.एम.आर. महाविद्यालय आकुर्डी)

मुली-
प्रथम क्रमांक:
साक्षी काळे(सी टी बोरा महाविद्यालय,शिरूर)
द्वितीय क्रमांक:
मृणाली काळेकर(डी.वाय.पी.आय.ई.एम.आर. महाविद्यालय आकुर्डी)
तृतीय क्रमांक:
वर्षाली जगताप(कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,इंदापूर)

स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्रीडा संचालक डॉ.राजाभाऊ ढोबळे,प्रा.ज्ञानदेव जाधव,प्रा.निलेश कांबळे,प्रा.सोहम कोकणे,प्रा.पंकज शेळके यांनी विशेष सहकार्य केले.

बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुलात “विज्ञानमित्र” व “विज्ञाननिष्ठ शिक्षक” पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

*⭕विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्ती जोपासावी:डॉ.पंडित विद्यासागर*

*बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुलात “विज्ञानमित्र” व “विज्ञाननिष्ठ शिक्षक” पुरस्कार वितरण समारंभ संपन्न*

*https://shivnerwarta.in/?p=17329*