समर्थ इंजिनिअरिंग च्या १० विद्यार्थ्यांची क्वालिटी कंट्रोल साठी संजय टेक्नोप्लास्ट मध्ये निवड

समर्थ इंजिनिअरिंग च्या १० विद्यार्थ्यांची क्वालिटी कंट्रोल साठी संजय टेक्नोप्लास्ट मध्ये निवड.

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील १० विद्यार्थ्यांची रांजणगाव येथील संजय टेक्नोप्लास्ट प्रा.लि. या कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.अण्णासाहेब गोजे यांनी दिली.
ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी म्हणून क्वालिटी कंट्रोल विभागात सदर विद्यार्थ्यांची निवड करत असल्याचे एच आर मॅनेजर अमोल कासमपूरे यांनी सांगितले.फ्रेशर विद्यार्थ्यांना क्वालिटी विभागाचा अनुभव या कंपनीमार्फत करियरच्या सुरुवातीलाच मिळणार असल्याने भविष्यात या अनुभवाच्या जोरावर विद्यार्थ्यांना आर अँड डी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील असे कंपनीचे डेव्हलपमेंट विभागाचे अधिकारी सुरज कोठावळे यांनी स्पष्ट केले.दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांना आवश्यक संभाषण कौशल्य,सॉफ्ट स्किल,तांत्रिक ज्ञान,व्यावहारिक ज्ञान आणि निर्णय क्षमता हीच यशाची पंचसूत्री असल्याचे अमोल कासम्पूरे यांनी सांगितले.यावेळी इंजिनिअरिंग चे डीन डॉ.दिपराज देशमुख,प्रा.प्रदीप गाडेकर,ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा.भूषण बोऱ्हाडे,मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा.अमोल खतोडे,प्रा.भाऊसाहेब कोल्हे,प्रा.सुबोध घाडगे आदी उपस्थित होते.
सदर कॅम्पस ड्राइव्ह मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:
सहादू फुलमाळी,नितीन फटांगरे,प्रवीण वाडकर,रत्नदीप हुडगे,ज्ञानेश्वर पवार,केतन सुराशे,सागर सरटे,सलमान चौगुले,गणेश गागरे,अजय कणसे.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्थ वल्लभ शेळके यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *