Placement News -2021

http://junnarvarta.blogspot.com/2021/09/blog-post_1.html

ग्रामीण विद्यार्थ्यांना वरदान ठरतेय बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुल.

बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)   येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.
ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली.
समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग
आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले,
सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची पुणे येथील एन एस डी एल या कंपनीमध्ये सपोर्ट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी निवड झाली व त्याला २.५ लाखाचे पॅकेज मिळाले.
तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग मधील
साईनाथ कुरकुटे याची टाटा कन्सलटिंग इंजिनिअर्स लि. मुंबई मध्ये ज्युनियर इंजिनिअर म्हणून ३.१८ लाखाचे पॅकेज,जयेश जाधव यांची श्री बालाजी कन्स्ट्रक्शन मुंबई मध्ये साईट इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,अनिल औटी याची श्री बेल्हेकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.रांजणगाव मध्ये साईट इंजिनिअर म्हणून २.०४ लाखाचे पॅकेज,मतीन मोमीन याची एमपायर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. मुंबई मध्ये साईट इंजिनिअर म्हणून १.८० लाखाचे पॅकेज,
शुभम बिचारे याची एस डी पी एल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.पुणे मध्ये ट्रेनी इंजिनिअर म्हणून १.४४ लाखाचे पॅकेज,शुभम शिंगोटे याची श्रुष्टी इन्फ्रास्ट्रक्चर एल एल पी रायगड मध्ये ज्युनियर इंजिनिअर म्हणून १.२० लाखाचे पॅकेज.                                          समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स(बी सी एस)
ओमश्री शिंगोटे याचे डाटा मेटिका मध्ये ३.८० लाखाचे पॅकेज,
ऐश्वर्या पाचपुते-टेक महिंद्रा मध्ये २.५० लाखाचे पॅकेज,
सायली भंडारी-टेक महिंद्रा मध्ये २.५० लाखाचे पॅकेज,
करण भोर या विद्यार्थ्याचे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(टी सी एस) मध्ये २.२० लाखाचे पॅकेज.
समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील
जयंत जाधव याची बजाज ऑटो लि. पुणे मध्ये २.०४ लाखाचे पॅकेज,आकाश सांडभोर याची जॉन डिअर प्रा.लि. शिक्रापूर मध्ये १.८६ लाखाचे पॅकेज,शिवम लामखडे याची जॉन डिअर प्रा.लि. शिक्रापूर मध्ये १.८६ लाखाचे पॅकेज,अजय शेटे याची बडवे इंजिनिअरिंग प्रा.लि. मध्ये १.८६ लाखाचे पॅकेज,ओंकार आतकरी याची जॉन डिअर प्रा.लि. शिक्रापूर मध्ये १.८६ लाखाचे पॅकेज,
समाधान पाटोळे याची जॉन डिअर प्रा.लि. शिक्रापूर मध्ये १.५६ लाखाचे पॅकेज,आदिती निकम या विद्यार्थिनीची अरसेलर मित्तल निपॉन स्टील पुणे येथे निवड व १.४४ लाखाचे पॅकेज,कृष्णा घोलप-व्हिनसन इको एनर्जी प्रा.लि.                               सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग
तुषार वायाळ या विद्यार्थ्याने एस आर पी बिल्डर अँड डेव्हलपर्स नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे,प्रवीण गुंजाळ या विद्यार्थ्याने जी के कन्स्ट्रक्शन नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे,निखिल औटी हा विद्यार्थी साधव ऑफशोअर इंजिनिअरिंग कंपनी मध्ये १.८ लाखाचे पॅकेज,अक्षय औटी -शिकवाणी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स पुणे-१.५६ लाखाचे पॅकेज,
योगेश गाडगे-श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन नावाने स्वतःचा व्यवसाय,रौनक खारवर-मळगंगा कन्स्ट्रक्शन,
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि विभागअश्विनी भाटे-बजाज ऑटो,अनिल भोर-अँफेनॉल इंटर कनेक्ट इंडिया प्रा.लि,
पायल फुटाणे-बजाज ऑटो,मंगेश गुंजाळ-जेबिल सर्किट इंडिया प्रा.लि.,अनिकेत खंडागळे-जेबिल सर्किट इंडिया प्रा.लि.,
सारिका निचित-बजाज ऑटो,निकिता फापाळे-बजाज ऑटो,
अश्विनी देशमुख-फॉरेव्हर लिव्हिंग प्रॉडक्ट इंटरनॅशनल-डिजिटल मार्केटिंग,शब्दाली थोरात-पॉलिप्लॅस्टिक कंपनी ,रांजणगाव.

संभाषण कौशल्य,सॉफ्ट स्किल,जावा व फुल स्टॅक डेव्हलपर मधील तांत्रिक ज्ञान व तत्सम सॉफ्टवेअर विषयीची अद्ययावत माहिती तसेच प्रात्यक्षिक व व्यावहारिक कौशल्ये या सर्व बाबींचा विचार निवड चाचणीमध्ये केलेला आहे.

औद्योगिक क्षेत्रामध्ये पदवी,पदविका अभियांत्रिकी तसेच व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणामुळे मुलांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत.रोजगाराच्या अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत.त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःला अपडेट ठेवावे असे यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,प्राचार्य राजीव सावंत,डॉ.लक्ष्मण घोलप,डॉ.अनिल पाटील,प्रा.अनिल कपिले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सदर उपक्रमासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.भूषण बोऱ्हाडे,प्रा.अमोल काळे,सर्व विभागप्रमुख यांनी विशेष परिश्रम घेतले

*⭕समर्थ संकुलातील चाळीस विद्यार्थ्यांची नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड*

*⭕समर्थ संकुलातील चाळीस विद्यार्थ्यांची नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड*

*https://shivnerwarta.in/?p=15788*

ग्रामीण विद्यार्थ्यांना वरदान ठरतेय बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुल.

बेल्हे येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.
ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली