समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथील सांस्कृतिक विभागाच्या वतीने समूह नृत्य स्पर्धेसाठी भिमाशंकर करंडक आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव २०२४ साठी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.जुन्नर,आंबेगाव,खेड,शिरूर तालुक्यातून तसेच परिसरातील बहुसंख्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.नृत्यातून मनोरंजनाचा अप्रतिम नृत्याचा कलाविष्कार सादर करणाऱ्या समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथील विद्यार्थ्यांनी भिमाशंकर करंडक २०२४ च्या महाअंतिम सोहळ्यामध्ये समूहनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावल्याची माहिती फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी दिली.
राष्ट्रीयस्तरीय शूटिंग बॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत समर्थ ज्युनिअर च्या वैष्णवी ढोबळे चे यश!!
“समर्थ मेगा फेस्टिवल” ला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; १२ हजार कुपनांची विक्री
समर्थ पॉलिटेक्निक मध्ये राज्यस्तरीय तांत्रिक पेपर सादरीकरण स्पर्धा संपन्न.
समर्थ शैक्षणिक संकुलात ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेचे आयोजन
समर्थ शैक्षणिक संकुलात ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे बहि:शाल विभाग व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स बेल्हे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जेष्ठ नागरिक कार्यशाळा आज संकुलामध्ये संपन्न झाली.धमाल विनोदी एकपात्री, हास्य पंचमी या कार्यक्रमाचे जनक मा.श्री.बंडा जोशी पुणे यांनी जेष्ठ नागरिकांना आपल्या विनोदातून व किस्स्यातून मनमुराद निखळ आनंद दिला.त्याचप्रमाणे गझलकार प्रा.जयसिंग गाडेकर,दत्तात्रय पायमोडे, अनिल काळे,बाळकृष्ण लळीत यांनी देखील उपस्थितांना वेगवेगळ्या विषयावर माहिती प्रदान केली. या कार्यशाळेसाठी तांबेवाडी, गुंजाळवाडी, बांगरवाडी, बेल्हे, गुळंचवाडी, आणे , नळवणे, झापवाडी मंगरूळ अशा अनेक ठिकाणावरून 200 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. समर्थ शैक्षणिक संकुलात या सर्व ज्येष्ठ नागरिकांना भोजन यावेळी संस्थेच्या वतीने समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या सहकार्यातून ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके, जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष, व इतर सर्व गावांमधील ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष उपस्थित होते. तसेच समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, समर्थ इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.गणेश बोरचटे, बहिशाल विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.हर्षदा मुळे, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वरताज गीत गायन स्पर्धेत श्रीनिका शेळके दुसरी
समर्थ शैक्षणिक संकुलात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव विवेक शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,बीसीएस चे प्राचार्य डॉ. उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी,प्रा.संजय कंधारे,एमबीएचे प्राचार्य शिरीष नाना गवळी,डॉ.महेश भास्कर,समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर,लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनिल कवडे,समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,आयटीआयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,विष्णू मापारी,समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश पाडेकर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
समर्थ मध्ये रस्ता सुरक्षा अभियान संपन्न; वेग आवरा,जीवन सावरा:- पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे
खेडी आणि ग्रामविकासासाठी तरुणांचे योगदान महत्त्वाचे -दिपक औटी
राजुरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन
सावित्रीबाई पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ लॉ कॉलेज बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास लोकसंख्या नियंत्रण जनजागृती पर विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन नुकतेच राजुरी येथे १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत करण्यात आलेले आहे.
या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती दिपक औटी यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके तसेच राजुरी गावच्या सरपंच प्रियाताई हाडवळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष बाळासाहेब औटी,मुंबई पोर्ट ट्रस्ट चे निवृत्त अधिकारी बबनराव हाडवळे,ज्ञानदीप पतसंस्थेचे अध्यक्ष गोरक्ष हाडवळे,विशाल ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील औटी,महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दिलीप घंगाळे,माजी अध्यक्ष संदीप औटी,ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ पाटील औटी, सखाराम गाडेकर,शाकीरभाई चौगुले,गणेश हाडवळे, महेंद्र हाडवळे,पांडू दादा कोरडे,सुरेश औटी,उंचखडक गावचे माजी उपसरपंच दत्तू नाना कणसे,जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे मेडिएटर अशोक भोर,समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,डॉ.बसवराज हातपक्की, डॉ. संतोष घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी मान्यवर आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबिरार्थी विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंचायत समितीचे माजी सभापती दिपक औटी म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेले कार्य गावच्या विकासासाठी दिशादर्शक ठरेल.खेडी आणि ग्रामविकासासाठी तरुणांचे योगदान महत्त्वाचे आहे.शिबिरामार्फत होणाऱ्या विधायक उपक्रमांसाठी गाव सर्वतोपरी मदत करेल असे सरपंच प्रिया हाडवळे म्हणाल्या.बबन हाडवळे यांनी विद्यार्थ्यांना पाणी वाणी आणि नाणी जपून वापरा तसेच सोशल मीडियाचा मर्यादित वापर करून विद्यार्थी दशेत जीवनाची दशा होऊ न देता योग्य दिशेने वाटचाल करावी असा मोलाचा सल्ला दिला.ग्राहक पंचायत चे बाळासाहेब हाडवळे यांनी पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेच्या माध्यमातून समृद्ध भारत घडवण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.