शिक्षण विभाग पंचायत समिती जुन्नर आणि अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या वतीने समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे बांगरवाडी येथे नुकतेच जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय शैक्षणिक साधन निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे व समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे,क्रीडा संचालक एचपी नरसुडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर ,जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजने,खजिनदार व्यंकट मुंढे तसेच जुन्नर तालुक्यातून ३० विज्ञान व गणित शिक्षक या कार्य- शाळेत सहभागी झाले होते.
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय) बेल्हे येथे नुकताच विद्यार्थी गुणगौरव व पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग प्रा. लि. चाकणचे डेप्युटी जनरल मॅनेजर अजित डावरे तसेच एच आर मॅनेजर किरण थोरात उपस्थित होते.
जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या युवा पर्यटन क्लब अंतर्गत स्थापित समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स व समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजीनियरिंग बेल्हे युवा पर्यटन क्लब व जुन्नर तालुका पर्यटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच “वैभवशाली जुन्नरचे पर्यटन” या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे व लेणी अभ्यासक सिद्धार्थ कसबे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आले.कार्यशाळेच्या सुरुवातीलाच पर्यटन क्लब मधील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गीत सादर केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके , सचिव विवेक शेळके,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. धनंजय उपासनी,बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.दिनेश जाधव,प्रा.भूषण दिघे,विद्यार्थी विकास अधिकारी गणेश बोरचटे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि समर्थ संकुलातील युवा पर्यटन क्लबचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.