राजुरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन

सावित्रीबाई पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ लॉ कॉलेज बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास लोकसंख्या नियंत्रण जनजागृती पर विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन नुकतेच राजुरी येथे १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत करण्यात आलेले आहे.

या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती दिपक औटी यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके तसेच राजुरी गावच्या सरपंच प्रियाताई हाडवळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष बाळासाहेब औटी,मुंबई पोर्ट ट्रस्ट चे निवृत्त अधिकारी बबनराव हाडवळे,ज्ञानदीप पतसंस्थेचे अध्यक्ष गोरक्ष हाडवळे,विशाल ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील औटी,महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दिलीप घंगाळे,माजी अध्यक्ष संदीप औटी,ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ पाटील औटी, सखाराम गाडेकर,शाकीरभाई चौगुले,गणेश हाडवळे, महेंद्र हाडवळे,पांडू दादा कोरडे,सुरेश औटी,उंचखडक गावचे माजी उपसरपंच दत्तू नाना कणसे,जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे मेडिएटर अशोक भोर,समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,डॉ.बसवराज हातपक्की, डॉ. संतोष घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी मान्यवर आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबिरार्थी विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंचायत समितीचे माजी सभापती दिपक औटी म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेले कार्य गावच्या विकासासाठी दिशादर्शक ठरेल.खेडी आणि ग्रामविकासासाठी तरुणांचे योगदान महत्त्वाचे आहे.शिबिरामार्फत होणाऱ्या विधायक उपक्रमांसाठी गाव सर्वतोपरी मदत करेल असे सरपंच प्रिया हाडवळे म्हणाल्या.बबन हाडवळे यांनी विद्यार्थ्यांना पाणी वाणी आणि नाणी जपून वापरा तसेच सोशल मीडियाचा मर्यादित वापर करून विद्यार्थी दशेत जीवनाची दशा होऊ न देता योग्य दिशेने वाटचाल करावी असा मोलाचा सल्ला दिला.ग्राहक पंचायत चे बाळासाहेब हाडवळे यांनी पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेच्या माध्यमातून समृद्ध भारत घडवण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.