समर्थमध्ये ग्राहक संरक्षण कायदा व प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन

अन्न नागरी,पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,महाराष्ट्र शासन तहसील कार्यालय,जुन्नर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत,जुन्नर आणि राष्ट्रीय सेवा योजना समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग व समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहक संरक्षण कायदा व प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते.या कार्यशाळेची सुरुवात अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आली.स्वामी विवेकानंद व मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी पर्यावरण समितीचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर उंडे,ग्राहक पंचायत जुन्नर तालुक्याचे संघटक शैलेश कुलकर्णी,तालुका संपर्कप्रमुख नंदाराम भोर,तालुका सहसंघटक कौशल्या ताई फापाळे तसेच संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,बीसीएस कॉलेजचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,प्रशासकीय अधिकारी प्रदीप गाडेकर,राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.दिनेश जाधव,प्रा.भूषण दिघे,प्रा.गौरी भोर,प्रा.अश्विनी खटिंग तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.