“समर्थ आय. टी.आय” च्या ६८ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड!!

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय) बेल्हे येथील आय टी आय च्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच “कॅम्पस ड्राईव्ह २०२३” चे आयोजन करण्यात आले होते.

या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये ६८ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी दिली.