समर्थ फार्मसी महाविद्यालयामधील दहा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील जी-पॅट परीक्षेत यशस्वी!!

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिटयूट संचलित समर्थ इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे (बांगरवाडी) येथील १० विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएट फार्मसी एप्टिट्यूड टेस्ट (जी-पॅट-२०२३) या राष्ट्रीय परीक्षेत यश संपादन केल्याची माहिती प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की व डॉ.संतोष घुले यांनी दिली.