समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) येथे नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजीनियरिंग बेल्हे,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,बेल्हे व निर्भया पथक आळेफाटा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “निर्भय कन्या अभियाना अंतर्गत संकुलातील विद्यार्थीनींसाठी कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या अभियानामध्ये संकुलातील ११६५ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,समर्थ एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.सुभाष कुंभार,ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या वैशाली ताई आहेर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमोल भोर,प्रा.अमोल काळे,क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे आदी उपस्थित होते.
आळेफाटा पोलीस स्टेशन च्या वतीने निर्भया पथकाच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देतांना पोलिस उपनिरीक्षक रागिणी कराळे यांनी विद्यार्थिनींसोबत चर्चात्मक संवाद साधला.महिलांवर होणारे अत्याचार,मुलींची छेडछाड रोखण्यासाठी निर्भया पथक कार्यरत असते.परंतु ते सर्वांपर्यंत घटना घडतात पोहोचलेच असे नाही.त्यासाठी स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे म्हणून अशा कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाची गरज असल्याचे यावेळी रागिणी कराळे म्हणाल्या.स्त्री सबलीकरण आणि सक्षमीकरण काळाची गरज आहे.संकुलामध्ये महिला सबलीकरण,व्यक्तिमत्व विकास,स्वास्थ्य,महिला उद्यमशीलता,स्त्री-पुरुष समानता यांसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना बौद्धिक,शारीरिक,मानसिक व भावनिक इ.स्तरावर विद्यार्थिनींना सक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो.
यावेळी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.
कराटे प्रशिक्षक विनायक वऱ्हाडी व महेंद्र गुळवे यांनी मुलींना स्वसंरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या डावपेचाची माहिती प्रात्यक्षिकासह दिली.
आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थिनींनी काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.आपल्यावर एखादा प्रसंग ओढावला असताना आपण त्या प्रसंगातून स्वतःची सोडवणूक करण्यासाठी आपल्या हाताच्या साह्याने पायाच्या साहाय्याने किंवा वेगवेगळ्या शारीरिक तंत्रशुद्ध प्रात्यक्षिकांच्या साह्याने कशाप्रकारे आत्मसंरक्षण करू शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवले आणि विद्यार्थिनींना देखील ते करायला लावले.आपल्या हाताचा पंजा त्याचप्रमाणे त्याचा होत असलेला वापर सक्षमतेने करण्यासाठी कशा प्रकारच्या हालचाली हव्यात, त्याचप्रमाणे जर चार ते पाच व्यक्तींनी आपल्यावर हल्ला केला तर तो हल्ला कसा परतवून लावायचा याबाबत सविस्तर प्रात्यक्षिक करून दाखवले.