समर्थ शैक्षणिक संकुलात ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे बहि:शाल विभाग व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स बेल्हे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जेष्ठ नागरिक कार्यशाळा आज संकुलामध्ये संपन्न झाली.धमाल विनोदी एकपात्री, हास्य पंचमी या कार्यक्रमाचे जनक मा.श्री.बंडा जोशी पुणे यांनी जेष्ठ नागरिकांना आपल्या विनोदातून व किस्स्यातून मनमुराद निखळ आनंद दिला.त्याचप्रमाणे गझलकार प्रा.जयसिंग गाडेकर,दत्तात्रय पायमोडे, अनिल काळे,बाळकृष्ण लळीत यांनी देखील उपस्थितांना वेगवेगळ्या विषयावर माहिती प्रदान केली. या कार्यशाळेसाठी तांबेवाडी, गुंजाळवाडी, बांगरवाडी, बेल्हे, गुळंचवाडी, आणे , नळवणे, झापवाडी मंगरूळ अशा अनेक ठिकाणावरून 200 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. समर्थ शैक्षणिक संकुलात या सर्व ज्येष्ठ नागरिकांना भोजन यावेळी संस्थेच्या वतीने समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या सहकार्यातून ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके, जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष, व इतर सर्व गावांमधील ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष उपस्थित होते. तसेच समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, समर्थ इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.गणेश बोरचटे, बहिशाल विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.हर्षदा मुळे, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.