*⭕समर्थ संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांना यंदाचा राष्ट्रीय स्तरावरील _”युवा उद्योजक पुरस्कार* .
*https://shivnerwarta.in/?p=9862*
*समर्थ संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांना यंदाचा राष्ट्रीय स्तरावरील _”युवा उद्योजक पुरस्कार “_*
“SBI General Insurance SME (Small & Medium Enterprises) Award ” हा पुरस्कार *’टाइम्स नेटवर्क’* च्या सहयोगाने लघु किंवा मध्यम व्यवसायातील नाविन्यपूर्ण,उल्लेखनीय,गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामगिरीसाठी *राष्ट्रीय पातळीवरील नवउद्योजकांना* (Youth Entrepreneur) दरवर्षी प्रदान केला जातो.
या पुरस्कारासाठी SBI General Insurance व *’टाइम्स नेटवर्क’* च्या माध्यमातून विशेष मुलाखती,सर्व्हे,उत्तम व्यवस्थापन व दर्जेदार सेवा तसेच विशिष्ट क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला जातो.
देशभरातील शेकडो व्यक्तींची व समूहाची नामांकन प्राप्त झाल्यानंतर अंतिम छाननी नंतर आज शनिवार दि.५ सप्टेंबर २०२० रोजी या पुरस्कारासाठी देशातील ५ व्यक्तींचे मानांकन करण्यात आलेले होते.त्यामध्ये *समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट,राजुरी या शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त मा.वल्लभ वसंतराव शेळके* यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे उभारलेल्या संस्थेमार्फत *शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या अभिनव कल्पनांच्या माध्यमातून उल्लेखनीय,गुणवत्तापूर्ण,नाविन्यपूर्ण व दर्जेदार शैक्षणिक कार्यामुळे* हा पुरस्कार *वल्लभ शेळके सर* यांना देण्यात आल्याचे SBI General Insurance च्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
*राष्ट्रीय स्तरावर यंदाचा नव उद्योजक* म्हणून मिळालेला हा बहुमान समर्थ संकुल व संस्थेसाठी एक मनाचा तुरा असून समाजातील विविध स्तरातून वल्लभ शेळके या युवा उद्योजकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके व सर्व पदाधिकाऱ्यांनी वल्लभ शेळके यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. या शैक्षणिक संकुलाच्या यशस्वी वाटचालीसाठी सर्व विभागातील प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचा मोलाचा सहभाग असल्याचे वल्लभ शेळके यांनी म्हटले.