ग्राहक दिन विशेष: ग्राहकांनी आयोगाकडे तक्रार करण्यासाठी इ – दाखील या कार्यप्रणालीचा वापर करावा-ॲड. तुषार झेंडे पाटील

*⭕ग्राहकांनी आयोगाकडे तक्रार करण्यासाठी इ – दाखील या कार्यप्रणालीचा वापर करावा-ॲड. तुषार झेंडे पाटील*

*https://shivnerwarta.in/?p=17382*

जिद्द,चिकाटी,मेहनत व सातत्यपूर्ण सराव हीच यशाची पंचसूत्री:प्रा.एच पी नरसुडे

*⭕जिद्द,चिकाटी,मेहनत व सातत्यपूर्ण सराव हीच यशाची पंचसूत्री:प्रा.एच पी नरसुडे*

*https://shivnerwarta.in/?p=17452*

*जिद्द,चिकाटी,मेहनत व सातत्यपूर्ण सराव हीच यशाची पंचसूत्री:प्रा.एच पी नरसुडे*
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा (मुले व मुली) समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) येथे दिमाखात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके व माजी प्राचार्य,राष्ट्रपती पुरस्कार विजेते एच पी नरसुडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती चे सचिव डॉ.रमेश गायकवाड,प्रा.डॉ.सुनील पानसरे,डॉ.संतोष पाचारणे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,प्रा.ज्ञानदेव जाधव,प्रा.अमृत पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एच पी नरसुडे म्हणाले की प्रत्येक खेळ हा आवडीने खेळला पाहिजे नव्हे नव्हे त्या खेळामध्ये आवड निर्माण केली तर यश नक्कीच तुमचे आहे.जिद्द,चिकाटी,मेहनत व सातत्यपूर्ण सराव हाच यशाचा खरा गाभा असून त्याचे तंतोतंत पालन करून जीवनात उत्कर्ष साधावा.मैदानी खेळ आणि व्यायामाने शारीरिक क्षमता तर बुद्धिबळ सारख्या खेळाने मानसिक क्षमता उंचावते असे ते यावेळी म्हणाले.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून दोनशे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
मुले-
प्रथम क्रमांक:
समीर इनामदार(राजमाता जिजाऊ महाविद्यालय,भोसरी)
द्वितीय क्रमांक:
यशोदीप खंडागळे(पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय,निगडी)
तृतीय क्रमांक:
दीपेश पटेल(डी.वाय.पी.आय.ई.एम.आर. महाविद्यालय आकुर्डी)

मुली-
प्रथम क्रमांक:
साक्षी काळे(सी टी बोरा महाविद्यालय,शिरूर)
द्वितीय क्रमांक:
मृणाली काळेकर(डी.वाय.पी.आय.ई.एम.आर. महाविद्यालय आकुर्डी)
तृतीय क्रमांक:
वर्षाली जगताप(कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,इंदापूर)

स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्रीडा संचालक डॉ.राजाभाऊ ढोबळे,प्रा.ज्ञानदेव जाधव,प्रा.निलेश कांबळे,प्रा.सोहम कोकणे,प्रा.पंकज शेळके यांनी विशेष सहकार्य केले.

बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुलात “विज्ञानमित्र” व “विज्ञाननिष्ठ शिक्षक” पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

*⭕विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्ती जोपासावी:डॉ.पंडित विद्यासागर*

*बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुलात “विज्ञानमित्र” व “विज्ञाननिष्ठ शिक्षक” पुरस्कार वितरण समारंभ संपन्न*

*https://shivnerwarta.in/?p=17329*

PLACEMENT NEWS:2021

 

PLACEMENT NEWS:2021

13 students of Department of Mechanical Engineering offered by “ACCURATE ENGINEEEING”

https://shivnerwarta.in/?p=16910