शेळके कुटूंबाने जपला ऐक्याचा वसा आणि वारसा

शेळके कुटूंबाने जपला ऐक्याचा वसा आणि वारसा

http://junnarvarta.blogspot.com/2021/11/blog-post.html

बेल्हे(वार्ताहर)  समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष वसंतराव शेळके,राजुरी गावचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच माऊली शेळके,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके व शेळके परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव व गावातील सर्व प्रमुख संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रत्येकवर्षी दिवाळीच्या सणाला सर्व मुस्लिम बांधवांना बोलावून दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन त्याचबरोबर प्रमुख मान्यवरांचा सत्कार असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून
राजुरी या गावाला एक ऐतिहासिक अशी वैचारिक बैठक आहे व ती जपण्याचा,जोपासण्याचा आणि प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न हिंदू मुस्लिम या बांधवांना एकत्रित घेऊन या दिवाळी फराळाच्या निमित्ताने शेळके कुटुंबियांमार्फत दरवर्षी केला जातो.

Leave a Reply