समर्थ च्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मध्ये मिळत आहेत नोकरीच्या संधी:

समर्थ च्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मध्ये मिळत आहेत नोकरीच्या संधी
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथील विविध विभागातील विद्यार्थ्यांना या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याचे संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी सांगितले.


समर्थ पॉलिटेक्निक मधील हरी पोखरकर,वैभव गुंजाळ व राहुल गाडगे या विद्यार्थ्यांची लार्सन अँड टर्बो लिमिटेड डिफेन्स या कंपनीमध्ये Technician Apprentice Trainee म्हणून तर
“MOTHERSON AUTOMOTIVE TECHNOLOGIES & ENGINEERING,PUNE” या मल्टी नॅशनल कंपनीमध्ये तुषार जोरे या विद्यार्थ्याची ट्रेनी टेक्निशियन म्हणून व विशाल थोरात आणि अतुल तोडकर यांची “BOSCH Chasis System Pvt. Ltd.,Chakan” येथे निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.
सदर विद्यार्थ्यांना वार्षिक २.०४ लाखाचे पॅकेज दिले जाणार असल्याचे विभागप्रमुख प्रा.महेंद्र खटाटे यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.महेंद्र खटाटे,प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर यांनी मार्गदर्शन केले.
समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग,बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयातील _सिव्हील इंजिनियरिंग विभागातील _ सद्दाम इनामदार या विद्यार्थ्याची _ज्युनियर इंजीनियर (Quality Checking)_ म्हणून “Nyati Engineers And Consultants,Pune” येथे निवड झाल्याची माहिती सिव्हील इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.प्रवीण सातपुते यांनी दिली.सदर विद्यार्थ्याला अडीच लाखांचे पॅकेज देणार असल्याचे प्रा.सातपुते यांनी सांगितले.
समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स(बी सी एस) मधील श्रुतिका पाचपुते हिची “Allianz Technology” या कंपनीत तर स्मिता वायकर या विद्यार्थिनींची “Austere Systems Private Limites,Pune” येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून निवड झाल्याचे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप यांनी सांगितले.
सदर विद्यार्थिनींना प्रत्येकी २.४ लाख पॅकेज व २.२ लाखाचे वार्षिक पॅकेज देण्यात येणार असल्याचे विभागप्रमुख प्रा.अमोल काळे यांनी सांगितले.
या सर्व विद्यार्थ्याचे संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य,विभागप्रमुख व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply