समर्थ रुरल एज्युकेशनल इंस्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स बेल्हे, राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बेल्हे(बांगरवाडी) आणि जुन्नर तालुका गणित व विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १५ जुलै २०२० रोजी सायंकाळी ६ ते ७.४५ या वेळात राज्यस्तरीय एक दिवसीय ऑनलाइन वेबिनार चे आयोजन करण्यात आलेले आहे.


पहिले पुष्प ज्येष्ठ विज्ञान प्रसारक आदरणीय प्राध्यापक विनय रमा रघुनाथ, मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे माजी अध्यक्ष हे गुंफणार असून त्यांचा विषय आहे ‘घरोघरी प्रयोगशाळा’.
दुसरे पुष्प ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. लहू गायकवाड,कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,नारायणगाव,ता.जुन्नर(पुणे)हे गुंफणार असून त्यांचा विषय आहे ‘गणिताचा इतिहास’.
सहभागी,पालक,विद्यार्थी व शिक्षक हे युट्युब किंवा फेसबुक द्वारे जॉईन होऊन या वेबिनार चा लाभ घेऊ शकता.वेबीनार नंतर फीड बॅक लिंक भरल्यानंतर आपणास ई- प्रमाणपत्र मिळेल.
या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा अशी विनंती आपणास समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट,बेल्हे(बांगरवाडी) आणि जुन्नर तालुका, गणित व विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी:प्रा.रतिलाल बाबेल-९८६०३८९९५६,

प्रा.प्रदीप गाडेकर-९६३७२३८०३४,

प्रा.प्रवीण ताजणे-९८९०९६५२५८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *